भुलेश्वर हे पुण्यापासून साधारण ५५ किमी अंतरावर स्थित शंकराचे मंदिर
आहे. हे मंदिर अंदाजे ख्रिस्तजन्मानंतर १२३० साली चौल्य वंशाच्या राजांनी
हे मंदिर बांधले. तर काही जाणकारांच्या मते मुख्य मंदिराचे बांधकाम ८ व्या
शतकामध्ये पांडव (?) वंशाच्या काळात झाले आणि बाह्य भिंतीचे काम १३ व्या
शतकामध्ये झाले. पण एका गोष्टीवर सर्वांचे एकमत आहे कि मूळ मंदिराचे
बांधकाम आधी झाले आणि त्यानंतर काही वर्षांनी बाह्य भिंत बांधली गेली. (
मंदिरासाठी वापरलेला दगड आणि भिंतीसाठी वापरलेला दगड हे पूर्णपणे वेगळे
आहेत ). पेशव्यांचे गुरु श्री ब्रह्मेंद्र स्वामी (Dhawadshikar) ह्यांनी
१८ व्या शतकामध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
ज्या डोंगरावर हे मंदिर स्थित आहे त्याला दौलतमंगल किल्ला (मंगळगड)
म्हणतात. हा किल्ला १६३४ मध्ये मुरार जगदेव ह्याने बांधला. (ह्या मुरार
जग्देवाने पुण्यावर १६३० मध्ये हल्ला केला आणि गाढवाचा नांगर फिरवला.
त्याने हा किल्ला पुण्यावर नजर ठेवण्यासाठी बांधला).
हे मंदिर शिवलिंग, तसेच मंदिराच्या भिंतीवरील कलाकुसरीसाठी तसेच अत्यंत
सुरेख आणि रेखीव मूर्तींसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे.. तसेच भारतीय
स्थापत्याचा एक उत्तम नमुना आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे कि जर आपली
इच्छा पूर्ण झाली (देवाचा कौल मिळाला) तर देवाच्या पिंडीखाली ठेवला जाणारा
प्रसाद गायब होतो. ह्या मंदिराचे दुसरे महत्त्व असे कि ह्या ठिकाणी
पार्वती आणि शंकराने एकत्र नृत्य केले आणि पुढे कैलास पर्वतावर जाऊन लग्न
केले असे मानले जाते.
ह्या मंदिरावर मुसलमान राज्यकर्त्यांची अनेक आक्रमणे झाली. त्यांनी ह्या
मंदिराच्या अनेक मूर्ती तोडून टाकल्या, कलाकुसरीचा संपूर्ण नाश केला..
अनेक मूर्तींचे हात पाय आणि डोकी उडवली आहेत, तसेच त्यांचा नाश करण्याचा
पुरेपूर प्रयत्न केला आहे. मंदिराचे हे भग्न रूप पाहून मन विशण्ण होते.
मंदिराकडे जाण्याचा मार्ग:
पुणे - सोलापूर महामार्गावर साधारण ४५ किमी अंतरावर यवत गावाच्या जवळ
उजवीकडे मंदिराकडे जायला एक फाटा आहे. येथून ७ किमी अंतरावर हे मंदिर आहे.
जाताना वाटेत अत्यंत तीव्र चढ असलेला घात लागतो. त्यामुळे वाहने सुस्थितीत
असल्याची खात्री करून मगच जावे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
येथे काही छायाचित्रांच्या लिंक्स देत आहे.
मी काढलेली छायाचित्रे:
http://www.flickr.com/photos/borkarabhijeet05/sets/72157626407645325/